टीम लय भारी
ठाण्याचा वाघ म्हणून ख्याती असलेले धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर “धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे” (Dharmaveer Mukkam Post Thane) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ठाण्याला शिवसेनेचा बालेकिल्ला ही ओळख देखील धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्यामुळे शक्य झाले. धर्मवीर आनंद दिघे याचं व्यक्तिमत्व म्हणजे ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले होते. (Dharmaveer Mukkam Post Thane Movie Releases On 13 May)
त्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या “धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे” (Dharmaveer Mukkam Post Thane)या चित्रपटाकडे लाखो शिवसैनिक डोळे लावून बसले आहेत. या चित्रपटाची निर्मिती सुरु झाली असून प्रवीण तरडे, मंगेश देसाई हे हा चित्रपट साकारणार आहेत.आजच “धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे” या चित्ररटाचा टिझर लाँच करण्यात आला आहे. १३ मे २०२२ या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटली येणार आहे.
View this post on Instagram
ठाणे जिल्हा आणि महाराष्ट्रात शिवसेना हि घराघरात पोहोचवण्यासाठी आणि प्रत्येकाच्या मनात शिवसेना रुजवण्यासाठी जे कार्य धर्मवीर आनंद दिघे (Dharmaveer Mukkam Post Thane) यांनी केल आहे ते थोडक नसून त्यांनी शिवसेनेसाठी केलेलं काम आणि कार्य हे नवीन पीडिला कळाल पाहिजे यासाठी हा चित्रपट साकारण्यात येणार असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा :-
आम्ही सगळे प्रबोधनकार वाचतो मात्र कुटुंबातील लोक वाचतात नसावेत – शरद पवार